| ग्रामिण विकासात शेती क्षेत्राचे महत्व अनन्य साधारण आहे. शेती मालाच्या उत्पादनात स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच्या काळात लक्षण्ीय वाढ झालेली आहे . भारतीय शेतकरी पारंंपारिक पिकांच्या तुलनेत फलोत्पादनाला रोख पिकाच्या उद्देशाने प्राधान्य देतो. जगातील एकूण फलोत्पादनापौकी 11 टक्के फलोत्पादन भारतात होते. फलोत्पादनामध्ये भारत जगातील दुस-या क्रमांकाचा मुख्य देश आहे. भारतातील अनेक फळांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. जगामध्ये केळी एक महत्वाचे पीक आहे. जागतिक स्तरावर केळी चौथ्या क्रमांकाचे अन्न असून तांदुळ, गहू आणि मका या नंतर केळी पीकाचा क्रमांक लागतो. केळी पौष्टिक फळ असून केळी पासून शरीराला लागणारी बहुतेक जीवनसत्वे आणि खनिजे प्राप्त होतात. केळी उत्पादनात जगात भारताचा पहिला क्रमांक असून भारतामध्ये तमिळनाडू , महाराष्ट्र, गुजरात, आंध्रपदेश, आसाम आणि मध्यप्रदेश या राज्यात केळीची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. केळी फळाला धार्मिक महत्व असून केळी बारमाही उपलब्ध असणारे फळ आहे. केळी आरोग्यवर्धक फळ असून सर्वांंना आवडणारे व आर्थिकदृष्टया परवडणारे फळ आहे. |